सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील नाले नदी च्या लगत असलेल्या परिसरातुन अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पाहावयास मिळतेय. या भागात रेती चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून याकडे संबंधित विभागाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील रेती तस्करीत पुढारी वावरणारे यांचाच पुढाकार सर्वाधिक असल्याचे नागरितून बोलल्या जात आहे. त्यामुळे आतापर्यंत संबंधित विभाग कारवाई साठी धजावत नसल्याने मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनाद्वारे रेती चोरी करून वाहतूक करणारे तस्कर बाहुबली ठरत असून तालुक्यात सर्रास रेती उपसा करीत असल्याचे माहिती आहे. हर्रास नसताना दररोज मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून, शासनाचा लाखों रुपयाचा महसूल बुडवत आहे. या रेती चोरट्यावर कोणाचा वरदहस्त म्हणायची वेळ आली आहे. हे अजूनही अनुत्तरीत आहे. तूर्तास संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून बऱ्याच कालावधीनंतर फक्त एका ट्रॅक्टरवर कार्यवाही केली असल्याचे वृत्त आहे.
दि.२३ नोव्हेंबर रोज मंगळवारच्या रात्री १२ वाजताच्या दरम्यान,दाडंगाव येथून एक अवैध रेती भरलेले चोरीचे ट्रॅक्टर पकडून महसूल विभागाने कार्यवाही केली. ट्रॅक्टर मालकाच्या वतीने लेखी जबाब नोंदवून रेती चोरीची जबाबदारी स्वीकारली. त्यावरून महसूल विभागाने १ ब्रास रेती किंमत ६००० रुपये व त्याच्या पाच पट दंड एकूण ३० हजार रुपये, ट्रॅक्टर किंमत १ लाख रुपये, रॉयल्टी ४०० रुपये असा एकूण १ लाख ३० हजार ४०० रुपयांचा दंड ट्रॅक्टर मालक यांच्यावर ठोठावला.
सात दिवसाच्या आत दंडाची रक्कम अदा न केल्यास व्याजासह दंड वसुलल्या जाणार असल्याचेही महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित विभागाच्या रात्रीच्या गस्तीने वाळूमाफियांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे.
रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 25, 2021
Rating:
