गझलनंदा यांना स्व. सुरेश भट गझलरत्न पुरस्कार घाेषित

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : कलाविष्कार कला क्रीडा बहु. शिक्षण संस्था भगोरा,जिल्हा अकोलाचे 2021 चे विविध पुरस्कार जाहीर झालेले आहेत.

त्यात गेली 42 वर्षे सातत्याने निर्दोष गझललेखन, गझलतंत्राचे मार्गदर्शन करणाऱ्या, ज्येष्ठ साहित्यिक गझलकारा, प्रा सुनंदा पाटील-मुंबई गझलनंदा यांना 
स्व.सुरेश भट गझलरत्त्न पुरस्कार घाेषीत झालेला आहे.
गझलनवाज पं.भीमराव पांचाळे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान 19 डिसेंबर 2021 राेजी मूर्तिजापूर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

अनेक शासकीय,साहित्यिक आणि विविध क्षेत्रात अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केलेल्या सूनंदाताईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राेवला गेला आहे. कारण,सुरेश भट यांच्या त्या मानस कन्या आहेत आणि त्यांच्या कडे गझल लेखनाचे त्यांनी धडे घेतले आहेत.

बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या धनी गझलनंदा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक मुख्य मार्गदर्शिका आहे. हे विशेष !
गझलनंदा यांना स्व. सुरेश भट गझलरत्न पुरस्कार घाेषित गझलनंदा यांना स्व. सुरेश भट गझलरत्न पुरस्कार घाेषित Reviewed by सह्याद्री चौफेर on November 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.