दालमिया कंपनी समाेर कामगारांचे आमरण उपाेषण - तिघांची प्रकृती चिंताजनक?

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्याच्या काेरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया कंपनी समाेर काही कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन दि.२३ नाेव्हेंबर पासून पुकारले असून अजून पावेताे त्यांचे मागण्या बाबत ताेडगा निघाला नाही. दरम्यान, उपाेषण कर्त्यांची नित्य वैद्यकिय पथकाकडुन तपासणी केल्या जाते परंतु शनिवार दि. २८ नाेव्हेंबर २०२१ रोजी रुग्णालयाचे एक पथक उपाेषण (मंडप) स्थळी आले असतांना उपाेषणकर्त्यांनी त्या पथकाला आपली तपासणी न करता परत पाठविल्याचे विश्वासनिय सुत्राने आमच्या प्रतिनिधीस आज संध्याकाळी सांगितले. जाे पर्यंत आम्हाला याेग्य न्याय मिळत नाही व आमच्या रास्त मागण्या पूर्ण हाेत नाही ताे पर्यंत आम्ही या मंडपातुन हटणार नाही असा निर्धार उपाेषणकर्त्यांनी केला आहे.

शासन व प्रशासनाने या आंदाेलनाची त्वरीत दखल घेणे फारच आवश्यक झाले आहे असे आता सर्व स्तरावरुन बाेलल्या जात आहे. उपाेषणकर्त्यां पैकी अशाेक निळकंठ कुचनकर, निळकंठ बाळकृष्ण लांडगे व हरीदास दशरथ धानाेरकर या तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे कळते.
सदरहु उपाेषण मंडप स्थळी पाेलिस विभागातर्फे तगडा पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला असून महसूल प्रशासनाच्या वतीने कायदा, शांतता व सुवस्था ठेवण्याच्या दृष्टीकाेणातुन काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलकर यांनी नायब तहसीलदार प्रविण चिडे, मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विशाल काेसनकर, काेतवाल रुपेश पानपटे यांची या उपाेषण स्थळी ड्यूटी लावली असल्याचे समजते.
 
दालमिया कंपनी समाेर कामगारांचे आमरण उपाेषण - तिघांची प्रकृती चिंताजनक? दालमिया कंपनी समाेर कामगारांचे आमरण उपाेषण - तिघांची प्रकृती चिंताजनक? Reviewed by सह्याद्री चौफेर on November 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.