हजरत टिपू सुलतान फाउंडेशन वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार- प्रा.नितेश कराळेंची कार्यक्रमाला उपस्थिती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या २७१ व्या जयंती निमित्त,दि.२७ नोव्हेंबरला कन्नमवार सभागृह राजुरा येथे,हजरत टिपू सुलतान फौंडेशन शाखा राजुराच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी तथा विविध सामाजिक संस्थांचा सत्कार कार्यक्रम थाटात पार पडला. या कार्यक्रमाला उपविभागीय वन अधिकारी राजुराचे अमाेल गर्कल ,संस्थापक अध्यक्ष हजरत टिपू सुलतान फौंडेशन चंद्रपूरचे अमजद पापाभाई शेख, नगर परिषद घुग्घुसच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खद खद फेम लाव्हारस मास्तर, फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संस्थापक प्रा. नितेश कराळे आणि वैचारिक व्यक्तिमत्व,इतिहास अभ्यासक,लेखक असा होता टिपू सुलतान सरफराज अहमद,सोलापूर हे होते.वक्त्यांनी अतिशय प्रभावी मार्गदर्शन करून उपस्थितीतांची मने जिंकली.
सदरहु कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी,व्यक्ती व सामाजिक संस्थां इत्यादी 50 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या व्यतिरिक्त वरुर रोड येथील युवा सामाजिक कार्यकर्ता विशाल शेंडे यांचा देखिल या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सदरहु कार्यक्रमाला प्रा.डॉ.संभाजी वरकड,विजय परचाके (गटशिक्षणाधिकारी) मुजावर अली (सायबर सेल,म.पो.चंद्रपूर), डॉ. येरमे दाम्पत्य, अस्लम चाऊस,इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.उपराेक्त कार्यक्रमाचे संचालन मुसा चांदसाहाब शेख (सदस्य HTSF राजुरा) यांनी केले.तर आभार प्रदर्शन शहबाज खान यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष अस्लाम चाउस, शोएब शेख, रियाज शेख, नदीम शेख, मुसा शेख, जलाल बियाबानी, जफर खान, स्वप्नील रामटेके व हजरत टिपू सुलतान शाखा राजुराच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
हजरत टिपू सुलतान फाउंडेशन वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार- प्रा.नितेश कराळेंची कार्यक्रमाला उपस्थिती हजरत टिपू सुलतान फाउंडेशन वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार- प्रा.नितेश कराळेंची कार्यक्रमाला उपस्थिती Reviewed by सह्याद्री चौफेर on November 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.