सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : ताडाेबा बफर झाेनला लागून असलेल्या चिचाेली गावातील काही व्यक्तींना वनविभागाच्या कर्मचारी वर्गांनी संशयापाेटी बेदम मारहाण केल्याची घटना दि.२४नाेव्हेंबरला घडली .या घटनेसंदर्भात दुर्गापूर पाेलिस स्टेशनला मारहाण झालेल्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली .संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने पाेलिसांनी वनविभागाच्या दाेन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या मारहाण प्रकरणात वनविभागाच्या अन्य काही कर्मचा-यांची देखिल चाैकशी हाेणार असून सदरहु प्रकणात निर्दाेष व अन्याय झालेल्या व्यक्तींना याेग्य न्याय मिळावा व जे काेणी अधिकारी व वन कर्मचारी या घटनेत जबाबदार असतील त्यांना निलंबितच नाही तर सेवेतून बडतर्फे करावे अशी मागणी राजू झाेडे व अॅड.फरहत बेग यांनी दाेन दिवसापूर्वी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचे कडे एका लेखी निवेदनातुन केली हाेती. या शिवाय अन्याय ग्रस्त व्यक्तींनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडे सुध्दा या बाबतीत तक्रार नाेंदविली हाेती. हे प्रकरण वनविभागाच्या कर्मचा-यांना चांगले भाेवणार असून, या प्रकरणात आपल्या पाठीमागे चाैकशीचा ससेमिरा लागू नये या साठी काही कर्मचा-यांनी धावपळ सुरु केली असल्याचे विश्वासनिय वृत्त आहे.
सदरहु मारहाण प्रकरणात आठ ते नऊ वन कर्मचा-यांचा समावेश असल्याचे बाेलल्या जाते. शिकारीच्या संशयापाेटी वन कर्मचा-यांनी चिचाेली गावातील काही व्यक्तींना अमानुषपणे मारहाण केली हाेती.
संशयावरुन अमानुष मारहाण, वनविभाग कर्मचा-यांच्या विरुध्द पाेलिस स्टेशनला गुन्हा दाखल !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 28, 2021
Rating:
