टॉप बातम्या

ग्रामीण भागात वाघाची दहशत अजूनही कायम


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपुर : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडाेबा जंगलात वाघांची संख्या काही कमी नाही. पूर्वी हे वाघ जंगलातच वास्तव्य करायचे पण आता हे वाघ चक्क! ग्रामीण भागातील गावाशेजारी दिवसढवळ्या येवू लागल्यामुळे ग्रामीण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज पावेताे या वाघांनी अनेकांना आपले शिकार बनविले आहे तर काही भागात याच वाघांनी कास्तकारांची जनावरे फस्त केली आहे. काही ठिकाणी शेतकरी शेतीवर जाण्यांस ही घाबरु लागले आहे. अश्यातच वेकाेली निलजई काेळसा खाण परिसरात एका वाघाने नुकतेच आपले दर्शन दिले.

दरम्यान, हा वाघ बघताच अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावा शेजारी येणा-या नरभक्षक वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ही ग्रामीण भागातुन आता जाेर धरु लागली आहे.
Previous Post Next Post