सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
या टॉवरला विरोध दर्शविण्याकरिता येथील नागरिक आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार यांच्या निवासस्थानी धडकले. तसेच उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन देऊन नागरिकांच्या निवासस्थानाजवळ एयरटेल मोबाईल नेटवर्क कंपनीचे टॉवर उभारू न देण्याची मागणी करण्यात आली आहे. टॉवर उभारण्याला दिलेली एनओसी रद्द न केल्यास टॉवर समोरच उपोषणाला बसण्याचा इशारा येथील रहिवासीयांनी दिला आहे.
गौरकर ले-आऊट येथे स्वमालकीच्या जागेवर एयरटेल मोबाईल कंपनीचे टॉवर उभारण्यास परवानगी देतांना येथील रहिवासीयांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नाही. जागा मालकाला विचारले असता त्याने नगर परिषदेकडे बोट दाखविले. न.प. नेच एनओसी दिल्याचे सांगितले. स्थानिकांची सहमती न घेता जागा मालकाने एयरटेल कंपनीशी करार करुन टॉवर उभारण्याला परवानगी देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आज निवेदन देतांना माजी नगराध्यक्षा प्रियाताई लभाने यांनी विद्यमान नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी मागील तिन वर्षात कोणत्याच कंपनीच्या टॉवर उभारणीला नगर पालिकेकडून एनओसी देण्यात आली नसल्याचे सांगितले. मग हे टॉवर काय जागा मालकाच्या आपसी संबंधातून उभारले जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याठिकाणी सेवानिवृत्त नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. अगदी निवासस्थाना जवळच हा टॉवर उभारला जात आहे. या टॉवर मधून निघणाऱ्या किरणांचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या किरणांच्या घातक परिणामांतून कर्करोग व अन्य अपायकारक आजार उद्भवत असल्याचे सिद्ध झाले असतांना देखील लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याला परवानगी देण्यात आली, याचेच नवल वाटते. केवळ कंपनीच्या करारातून मिळ्णाऱ्या रक्कमेपोटी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणलं जात आहे. याला लालसा म्हणावी की, अन्य काय हेच कळायला मार्ग नाही. मोबाईल टॉवर मधून येणाऱ्या लहरी आरोग्यास घातक असतात. मोबाईल टॉवरद्वारे होणाऱ्या रेडीएशनच्या दुष्परिणामांमुळे चिमण्या, कावळे व मधमाशांची संख्या कमी होऊ लागली आहे. या लहरींचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले असतांनाही नागरिकांच्या अगदी निवासस्थाना जवळ मोबाईल टॉवर उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. हे टॉवर उभारण्याचे काम बंद न केल्यास या टॉवर समोरच उपोषणाला बसण्याचा इशारा येथील नागरिकांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनतुन दिला आहे.
नगर पालिकेने स्थानिकांची सहमती न घेता एनओसी दिली कशी, व जर नगर पालिकेने एनओसी दिली नाही तर टॉवर उभारलेच कसे, याची चौकशी होणे आता गरजेचे झाले आहे.
शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील गौरकार ले-आऊट येथे उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 29, 2021
Rating:
