चंद्रपूर मनपाचा भाेंगळ कारभार जनता त्रस्त, नगरसेवक करताेयं दुर्लक्ष

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : नगर परिषदेचे रुपातंर महानगर पालिकेत झाल्या नंतर चंद्रपूरकरांना सर्व सुविधा उपलब्ध हाेवून लाेकांचे प्रश्न व समस्या जलद गतीने दूर हाेतील अशी अपेक्षा हाेती. पण आज ही येथील जनतेला अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत असल्याचे चित्र सध्या चंद्रपूर शहरात दृष्टीक्षेपात पडु लागले आहे.

दरम्यान, याच समस्या अडचणी व प्रश्ना बाबत राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते प्रत्यक्षात आपला आवाज बुलंद करु लागल्याचे एकंदरीत दिसत आहे. रविवार दि.२८ ला स्थानिक विक्तु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या पद्धतीने नालीचे अर्धवट काम केल्याने वाहत आलेले संडास व बाथरूम चे सांड पाणी हे तेथील नागरिकांच्या घरात शिरत असून संपूर्ण परिसरात ही घाण पसरून आजूबाजूच्या लोकांना रोगराईला समोर जावे लागत आहे .या आशयाची तक्रार तेथील नागरिकांनी आपचे शहर सचिव राजु कुडे यांच्या कडे केली.
परिसरातील लोकांनी आपचे कुडे यांना तक्रार करतांना सांगितले की, या भागातील ४ लोकांना मागील काही दिवसांत डेंग्यू झाला. त्या मुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
वारंवार नगर सेवक यांना तक्रार करून सुध्दा ते या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे तेथील नागरिकांनी या वेळी सांगितले.

जाणीव पूर्वक नालीचे अर्धवट काम करून जनतेचा जीवाला धोका निर्माण केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून संबधित दोषी अधिकारी व ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी या शिवाय अर्धवट नालीचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी जनतेनी केली आहे. या बाबतीत जनतेला न्याय मिळाला नाही तर,आम आदमी पार्टी बाबुपेठ परिसरातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन करेल असा इशारा आपचे शहर सचिव राजु भाऊ कूडे यांनी आज दिला आहे 

या वेळेस आपचे शहर सचिव बाबाराव खडसे, दीपक निपाणे, सागर बोबडे, सुखदेव दारुंडे, श्रीराम खंडाळे, सुजाता बोदेले, प्रवीण चूनारकर, जयदेव देवगडे, सुमित रायपुरे, चंदू माडूरवार, विशाल रामगिरवार, करण नक्षिने, जयंत थूल, महेश गुप्ता, अंजू रामटेके, स्मिता लांडे, छाया इदे, विभा कुळमेथे, इंदिरा आलाम, महेश आलाम आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रपूर मनपाचा भाेंगळ कारभार जनता त्रस्त, नगरसेवक करताेयं दुर्लक्ष चंद्रपूर मनपाचा भाेंगळ कारभार जनता त्रस्त, नगरसेवक करताेयं दुर्लक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on November 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.