दालमिया कंपनी समाेरील प्रकृती चिंताग्रस्त असलेल्या सातही उपाेषणकर्त्यांना पाेलिस बंदाेबस्तात चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
 
चंद्रपूर : जिल्ह्याच्या काेरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया कंपनी समाेर काही कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी दि.२३ नाेव्हेंबर पासून बेमुदत अन्नत्याग आंदाेलन पुकारले हाेते. दरम्यान, आज सोमवार दि.२९ नाेव्हेंबरला सकाळी त्या सात ही उपाेषणकर्त्यांची डॉक्टर मंडळीकडुन वैद्यकीय तपासणी करुन त्यांना पाेलिस बंदाेबस्तात चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या वेळी महसुल विभागासह पाेलिस विभागाचे वरिष्ठ पाेलिस अधिकारी हजर हाेते. दाेन दिवसांपूर्वी उपाेषणकर्त्यां पैकी अशाेक निळकंठ कुचनकर, निळकंठ बाळकृष्ण लांडगे व हरीदास दशरथ धानाेरकर या तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक हाेती त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी एक वैद्यकीय पथक उपाेषण मंडपात आले हाेते परंतु उपाेषण कर्त्या कामगारांनी त्यांना आपली वैद्यकीय तपासणी न करता ते पथक परतुन लावले हाेते. विशेष म्हणजे पाेलिस विभागातर्फे बेमुदत उपाेषण आरंभ झालेल्या दिवसांपासून या ठिकाणी कडेकाेट पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता तर महसूल प्रशासनाच्या वतीने कायदा, शांतता व सुवस्था ठेवण्याच्या दृष्टीकाेणातुन काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलकर यांनी नायब तहसीलदार प्रविण चिडे, मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विशाल काेसनकर, काेतवाल रुपेश पानपटे यांची या उपाेषण स्थळी नेमणूक केली हाेती. सदरहु उपाेषण मंडपात एकूण सात कामगार बेमुदत उपाेषणास बसले हाेते.
 
उद्या मंगळवार दि.३० नाेव्हेंबरला कामगार मागण्यांचे संदर्भात एक बैठक काेरपना तहसील कार्यालयात बाेलविण्यांत आली असुन तश्या आशयाचे पत्र दालमिया कंपनी व्यवस्थापक, मनसे नेते सचिन भाेयर व पाेलिस निरीक्षक काेरपना यांना पाठविण्यांत आले आहे. ही बैठक उपविभागीय अधिकारी राजूरा यांचे अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता हाेत असल्याचे समजते.
दालमिया कंपनी समाेरील प्रकृती चिंताग्रस्त असलेल्या सातही उपाेषणकर्त्यांना पाेलिस बंदाेबस्तात चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविले ! दालमिया कंपनी समाेरील प्रकृती चिंताग्रस्त असलेल्या सातही उपाेषणकर्त्यांना पाेलिस बंदाेबस्तात चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविले ! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.