बुलेटने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : बुलेटने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज २१ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी मुकुटबन मार्गावरील संतधाम जवळ घडली. पवन मेश्राम (३२) रा. गणेशपूर असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सुरेश विधाते असे गंभीर जखमी झालेल्या त्याच्या मित्राचे नाव आहे. 

पवन मेश्राम हा त्याचा मित्र सुरेश विधाते याच्या सोबत दुचाकीने जात असतांना वणी वरून कायरकडे जाणाऱ्या भरधाव बुलेटने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. दुचाकीवर मागे बसून असलेला पवन दुचाकीवरून उसळून खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. अती रक्तस्त्राव झाल्याने पवनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवीत असलेला त्याचा मित्र सुरेश हा गंभीर जखमी झाला. दोघांनाही तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पवनला डॉक्टरांनी मृत घोषित केले. बुलेट चालकाने बुलेट क्रं MH ३४ AR ४३३४ ही घटनास्थळीच सोडून तो पसार झाला. पोलिसांनी बुलेट चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे. मृतक पवन मेश्राम हा विवाहित असून त्याला २ वर्षाची मुलगी आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
बुलेटने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी बुलेटने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.