आधीचे मित्र,जागेवरील बांधकामावरून झाली त्यांच्यात फ्री स्टाईल

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : एकेकाळी एकमेकांचे कट्टर मित्र असलेल्या दोघा जणांनी मैत्रीच्या नात्याला तिलांजली देत एकमेकांविरुद्धच दंड थोपटल्याने शहरात त्यांच्या फ्री स्टाईल ची चांगलीच चर्चा रंगली आहे. दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांच्या मैत्रीत आलेलं वैरत्व समोर आलं आहे. कारण होतं प्रतिष्ठित सोने चांदी विक्रेत्याच्या प्लॉटवर लोखंडी शेड बांधण्याचा ठेका घेण्याचं. लगतचा प्लॉट पूर्वीच्या मित्राचा असल्याने त्याने लोखंडी शेड बांधण्याचा ठेका घेतलेल्या आपल्या जुन्या मित्राशी बांधकामावरून वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला प्राप्त झाली आहे.  

बांधकाम ठेकेदार असलेले दोघे जण एकेकाळी जिवलग मित्र म्हणून ओळखले जायचे. कालांतराने त्यांच्या मैत्रीत वैरत्व येऊन आज ते एकमेकांचे शत्रू बनले आहेत. जटाशंकर चौकातील प्रतिष्ठित सोने चांदी विक्रेत्याच्या प्लॉटवर लोखंडी शेड बांधण्याचा ठेका उमेश पोद्दार या बांधकाम ठेकेदाराने घेतला. लगतच समीर रंगरेज याचा प्लॉट असल्याने त्याने बांधकामात अडथळे निर्माण केले. माझ्या प्लॉट शेजारी तू लोखंडी शेड बांधण्याचे काम का घेतले म्हणून समीर रंगरेजने उमेश पोद्दार यांच्याशी वाद घातला. माझ्या मोहल्ल्यात तू बांधकाम करायचे नाही, असे समीर रंगरेजने उमेश पोद्दार यांना ठणकावून सांगितल्यानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी उडाली. वाद विकोपाला जाऊन त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत एकमेकांशी फ्री स्टाईल केली. समीर रंगरेजने यानंतर माझ्या मोहल्ल्यात बांधकामाची कामे घेतल्यास तुला बघून घेईल, अशी खुली धमकी दिल्याचे उमेश पोद्दार यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून म्हटले आहे. जिवलग मित्रांमध्ये आलेलं शत्रुत्व व त्यांच्यामध्ये झालेली फ्री स्टाईल शहरात चर्चेचा विषय बनली आहे. याबाबत उमेश पोद्दार यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी समिर रंगरेज याच्या विरुद्ध भादंवि च्या कलाम ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. समीर रंगरेजनेही उमेश पोद्दार यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून उमेश पोद्दार यांच्यावरही गुन्हे नोंदविण्यात आले आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
आधीचे मित्र,जागेवरील बांधकामावरून झाली त्यांच्यात फ्री स्टाईल आधीचे मित्र,जागेवरील बांधकामावरून झाली त्यांच्यात फ्री स्टाईल Reviewed by सह्याद्री चौफेर on November 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.