सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात दिवसा ढवळ्या पडलेल्या दराेडा प्रकरणातील आराेपींना काही तासांतच शाेधून काढण्यांत रामनगर गुन्हे शाखेच्या पाेलिसांना यश प्राप्त झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान या दराेडा प्रकरणात आराेपी १:७३ काेटींची रक्कम घेवून फरार झाले हाेते. पाेलिसांनी त्यांचे कडुन ती रक्कम व काही चार चाकी वाहने जप्त केली आहे. गेल्या बुधवारी स्थानिक अरविंद नगर परिसरातील एका व्यापा-याच्या निवास स्थानी जावून आराेपींनी घरातील महिलांना भर दुपारी पिस्तुल व चाकुचा धाक दाखवून दराेडा टाकला हाेता. या घटनेमुळे चंद्रपूरातच नव्हे तरं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली हाेती. दराेड्यातील आराेपींना पकडण्यांसाठी गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी अथक परिश्रम घेवून ४ आराेपींना अटक केली आहे. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून या घटनेतील आराेपींना पाेलिसांनी नागपूर, व बल्हारपूर शहरातुन अटक केली आहे. त्यांना पकडण्यांसाठी पाेलिस विभागाने विशेष पथक तयार केले हाेते.
चंद्रपूरातील दराेडा प्रकरणात आराेपींना पकडण्यात आले पाेलिसांना यश !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 21, 2021
Rating:
