सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
जीवनप्रवासात आयुष्य जगत असतांना ह्या सुंदर भूतलावर आपण जन्माला आलो याचा आनंदोत्सव म्हणून जन्मदिवस साजरे होतात आणि होतच राहतील पण काही व्यक्तीमत्व अशी असतात ज्यांचे जन्मदिवस फक्त स्वतः पुरताच आनंदोत्सव साजरा करण्याकरीताच करत नाहीत तर आपला जन्मदिवस साजरा होतांना .. दुसऱ्याच्यां जीवनात आनंद कसा निर्माण करेल ह्याच भावनेतून साजरे केले जातात आज ज्यांचा वाढदिवस सोहळा आहे ते व्यक्तीमत्व म्हणजे वणी, वणी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण आपल्या वणी विधानसभा क्षेत्रात सामाजिक कार्याच्या माध्यमातून ज्यांनी समाज्यात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे सोबतच पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनात आपलं अनमोल योगदान देत खऱ्या अर्थानं निसर्गप्रेमी म्हणून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व अर्थात युवासेना चे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय. श्री अजिंक्य शेंडे साहेब या युवा दिलाचा दिलखुलास, दिलदार व्यक्तीमत्वाचा आज "वाढदिवस".
आजचा दिवस खऱ्या अर्थाने अनेक समाजपयोगी कार्यांच्यां पर्वणीचाच दिवस म्हटलं तर वावगं ठरणारं नाही !
श्री अजिंक्य शेंडे यांच्या जन्मदिना निमित्त ह्या संवेदनशील मनाच्या आणि दिलदार स्वभावाच्या महानुभवांनीं एक हृदयस्पर्शी कार्य केलं ते म्हणजे कोरोनाकाळात गरज असलेल्या गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडर सेवा दिली. वणी आगारातून चंद्रपूर निघालेल्या बस च्या बिघाड पाहून होणारा अपघात त्यांनी टाळला, त्यात 30 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले. येथील जाधव कुटुंबियांना मदतीचा दिला. कॅन्सर ग्रस्त बालक युग ला मदतीला सरसावले. बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील अबाल वृद्ध जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
ह्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या दिनी शिवसेना नेते सुनील भाऊ कातकडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, प्रत्येक माणसाची यशस्वीता ही त्याच्या कार्यावर अवलंबून असते. अजिंक्य शेंडे यांचा जन्मदिवस म्हणजे ह्या समाजासाठी एक आनंदाची पर्वणीच. अजिंक्य शेंडे हे रात्रंदिवस मदतीला धावून सामाजिक दायित्व करित असतात. विद्यार्थी, नागरिक यांची सुविधा सेतू केंद्रातून होणारी आर्थिक लूट थांबवावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ सेतू केंद्र बंद करण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ता व उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करताना अजिंक्य शेंडे हे फक्त शहरांपुरतं मर्यादित न राहता ह्या वणी विधानसभेत राहणाऱ्या समाज बांधवां करीता एक आशेचा किरण बनून सदैव गरजूच्या पाठीशी अहोरात्र उभे राहतात. आणि या पुढे आपण सर्वांनी पण पुढाकार घेत राजकारण बाजूला सारून सामाजिक कार्य कसे करता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून
ह्या अभिष्टचिंतन सोहळ्या दिनानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रातील तमाम बांधवाकडून त्यांच्या कार्यास दंडवत..
युवा आनंदोत्सवच म्हणून युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा: मोठया मनाचा राजा माणूस
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 21, 2021
Rating:
