आदर्श सरपंच भास्कराव पेरे पाटील आज वणीत

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : पाटोद्याचे आदर्श सरपंच म्हणून ख्याती प्राप्त असलेले भास्कराव पेरे पाटील आज वणीत येणार आहे. शहरातील शेतकरी मंदिर येथे आयोजित गावपातळी वरील कोरोना योध्यांच्या सत्कार सोहळ्यात ते मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित राहणार आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या कुशल कतृत्वाने पाटोदा या गावाची ओळख संपूर्ण राज्यात निर्माण करणारे भास्करराव पेरे पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन या सत्कार सोहळ्यात उपस्थिती दर्शविणाऱ्यांना लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळूभाऊ धानोरकर राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार वजाहत मिरझा, आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष ऍड. देविदास काळे, महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष विनोदभाऊ पटोले, मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, यवतमाळ जी.प. सदस्या अरुणाताई खंडाळकर यांची उपस्थिती लाभणार आहे. 

कोरोना काळात गावपातळीवरील ग्रामपंचायतेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून लोकसेवेला प्राधान्य दिले. सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कोरोना योद्धयांची भूमिका निभावली. कोरोनाच्या या कठीण काळात गावकऱ्यांना धीर देत त्यांचे मनोधर्य वाढविले. अशा या गावपातळीवरील ग्रामपंचायतेच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे. कोरोना काळात गावकऱ्यांना सेवा पुरवितांना स्वतः कोरोना बाधित होऊन मृत्यू ओढावलेल्या चिखलगाव, बोर्डा, बोरगाव व मारेगाव (कोरंबी) येथील सरपंच, उपसरपंच यांना यावेळी श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांचे मान्यवरांच्या उपस्थितीत सांत्वन करण्यात येणार आहे. गावपातळीवरील या कोरोना योद्धयांच्या सत्कार सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक प्रा. टिकाराम कोंगरे यांनी केले आहे.
आदर्श सरपंच भास्कराव पेरे पाटील आज वणीत आदर्श सरपंच भास्कराव पेरे पाटील आज वणीत Reviewed by सह्याद्री चौफेर on November 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.