टॉप बातम्या

हिवरा शिवारात आढळला बिबट्याचा संशयास्पद मृतदेह

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

महागाव : हिवरा शिवारात पाच वर्षीय बिबट्याचा अर्धवट सडलेला मृतदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली असुन वनविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
महागाव तालुक्यातील काळी(दौ) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या लेवा बिट मधील हिवरा (संगम) शिवारात जंगलात एका पाच वर्षीय नर जातीचा बिबट्याचा अर्धवट सडलेला मृतदेह संशयास्पद रित्या आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली .याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कुरोडे,क्षेत्र सहाय्यक पि. पि. गंगाखेडे, एस.एस.जाधव ,वनरक्षक कु.एम.डी. मुसळे यांच्यासह काळी वनपरिक्षेत्र कार्यालयातील सर्व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा करून पुसद येथील पशु चिकित्सक डॉ.बि.आर.राठोड यांना पाचारण करून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले.याबिबट्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला ,त्याची हत्या करण्यात आली की नैसर्गिक मृत्यु झाला याबद्दल चर्चेला उधाण आले असुन बिबट्याचा सडलेला मृतदेह सापडल्याने जंगलात वन्यप्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या वन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Previous Post Next Post