सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी
चिमूर : नेरी ग्राम पंचायतच्या ग्राम विकास अधिका-याचे पद नुकतेच भरले असून ते पंचायत समिती चिमूर येथे रुजू झाले आहे. नेरी येथे रुजू होणार असतानाच प्रभारी कार्यभार बघणारे ग्राम सेवक नखाते यांनी आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ग्राम पंचायतचा पदभार न देता त्यांना चुकीचा संदेश देत रुजू होऊ दिले नाही. व झालेल्या कामाचे नियम बाह्य बिल काढले असल्याचे समजते माहिती अधिकारातील व पत्राद्वारे केलेली मागणी प्रमाणे कागद पत्र त्यांनी पुरविले नाही. नखाते यांनी ग्राम पंचायत चे सगळे नियम डावलून मन मर्जीने काम सुरू केले असल्याचे दिसून येते. मुख्यालयात ते नियमित हजर राहत नाही. त्याच प्रमाणे उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम विभाग चिमूरचे बांगडे यांना तिसऱ्या महिण्यांपासून दोन पत्रे देऊन झाले. पंधरा ते वीस वेळा प्रत्यक्ष दूरध्वनीवर संपर्क साधला असता कारवाई करतो एवढेच उत्तर मिळत असल्याचे माजी जि.प. सदस्य विलास डांगे यांनी म्हटले आहे परंतु यात चाैकशी झाली नाही. संबधित ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास मुंडण आंदोलन करण्याचा इशारा डांगे यांनी नुकताच दिला आहे.
नेरी ग्राम पंचायतचा मनमानी कारभार विलास डांगेंचा आराेप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 10, 2021
Rating:
