मालेवाडा येथे वंदनीय तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव


सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी

चिमूर : जीवनामधे मानवाला खुप मोठा अहंकार आहे, जो व्यक्ति पैसे कमावुन मोठा झाला त्यांचे नाव येथे चालत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आम्बेडकर, डॉ. ऐ. पी.जे अब्दुल कलाम यानी पैसा नाही कमविला, त्यानी अहंकार सोडून समाधानाच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले, म्हणून तेच आज अमर झालेत असे विचार चिमूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ यानी मालेवाडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथि निमित्त आज व्यक्त केले,
         
ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथीचा कार्यक्रम चिमूर तालुक्यात्यातील मालेवाडा येथे सम्पन्न झाला या वेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड, कृषि उत्तपन बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम डुकरे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य राजु पाटिल झाडे, प्रा. चरडे , प्रान्त सेवाधिकारी विठ्ठलराव सावरकर, सेवाधिकारी नत्थुजी भोयर, प्रा.संजय पीठाडे, केशव वरखडे, कापसे महाराज व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता गुरुदेव सेवा मंडळ मालेवाडाच्या गुरुदेव भक्तांनी अथक परिश्रम घेतले.
मालेवाडा येथे वंदनीय तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव मालेवाडा येथे वंदनीय तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव Reviewed by सह्याद्री चौफेर on November 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.