सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : एसटीचे राज्य शासनात विलीकरण करण करा या प्रमुख मागणी साठी एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी महाराष्ट्रात पुकारलेला संप अद्याप मिटलेला नसुन त्यांचे काम बंद आंदोलन हे गेल्या २९ ऑक्टाेबरपासून सुरु झालेले आहे. दरम्यान या संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एसटीची चाके बंद पडली असुन, शहरातील काही संघटनेंनी या आंदाेलनाला आपला पाठिंबा जाहिर केला आहे. संप करणां-या कर्मचा-या विराेधात आता शासनाने कडक पावले उचलने सुरु केले असुन काल मंगळवारला चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी महामंडळातील १४ व आज बुधवारी १४ एसटी कर्मचा-यांना निलंबित केले असल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्यातील कर्मचारी निलंबनाची संख्या आता २८ च्या घरात पाेहचली आहे. नियमबाह्य संप करणे हा ठपका या निलंबित कर्मचा-यांवर ठेवण्यात आल्याचे समजते. एसटी कर्मचारी वर्गांच्या संपामुळे खासगी ट्रॅव्हल्सना सुगीचे दिवस आले आहे. हे मात्र, तेव्हढेच खरे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे २८ कर्मचारी निलंबित !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 10, 2021
Rating:
