सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नांदेड : एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनामध्ये विलिनीकरणसाठी, गेल्या दहा ते बारा दिवसापासून चाललेल्या संप व उपोषणाला भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेने आज पाठिंबा दिला आहे.
एस टी चे राज्यभर चिघळले आंदोलन:
एस टी महामंडळाच्या विषयांकित मागणी बऱ्याच वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असून त्यांची मागणी रास्त आहे. याचा शासनाने तात्काळ विचार करून त्यांची मागणी मान्य करावी. असे सीमा स्वामी लोहराळकर मराठवाडा उपकार्याध्यक्षा महिला आघाडी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य यांनी सुरु असलेल्या उपोषणाला भेटी दरम्यान मत व्यक्त केले. यावेळी सुप्रिया डोणेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते.
यावेळी नांदेड आगार व्यवस्थापक व
एस टी महामंडळाचे कर्मचारी तसेच उपोषणाकर्त्यांनी संघटनेचे जाहिर आभार मानले.
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला "एस टी" उपोषणाला पाठिंबा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 10, 2021
Rating:
