खंडणी येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत भुरकी पोड (खंडणी) येथील हरिदास रामपूरे (५०) या इसमाने खंडणी व भुरकी पोड शिवाराच्या मध्ये जंगल असलेल्या परिसरात झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१७ नोव्हेंबर बुधवार ला सकाळी साडेसात च्या दरम्यान, ही घटना उघडकीस आली आहे. 

याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलीस ठाण्याला दिली. हरिदास वसंता रामपुरे यांना पोटाचा त्रास होत. असल्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातवाईकांनी  यावेळी आहे. 

माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरिदास यांच्या पाठमागे पत्नी, तीन मुली एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
खंडणी येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या खंडणी येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on November 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.