गोवंश जनावरांच्या तस्करीचा डाव पोलिसांनी उधळला, खडबडा मोहल्ला येथे धाड टाकून १४ जनावरांची केली सुटका


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरातील खडबडा मोहल्ला गोवंश तस्करीसाठी कुप्रसिद्ध होऊ लागला आहे. गोवंश जनावरांची लगतच्या प्रांतात तस्करी केली जात असून कत्तली करिताही जनावरांची अवैध विक्री या परिसरातून केली जाते. पोलिसांनी खडबडा मोहल्ला येथे अनेक वेळा धाडी टाकून गोवंश जनावरांची तस्करी उधळून लावली असली तरी तस्कर शिरजोर होऊन जनावरांच्या अवैध खरेदी विक्रीचा हा धंदा धडल्याने चालवत आहे. गोवंश जनावरांचं अवैध खरेदी विक्रीच मार्केट म्हणून आता हा मोहल्ला नावारूपास येऊ लागला आहे. गोवंश जनावरांच्या कत्तली करून त्यांचं मांस विकण्याचा प्रकारही याठिकाणी सुरु असतो. पोलिसांनी या ठिकाणी धाडी टाकून असंख्य जनावरांची तस्करांच्या तावडीतून सुटका केली आहे. परंतु गोवंश तस्करीचा हा बाजार बंद होता होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. काल मध्यरात्रीही पोलिसांनी खडबडा मोहल्ला येथे धाड टाकून तस्करांचे मनसुबे उधळून लावले. १४ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता केली. मालवाहू वाहनात कोंबून असलेल्या या जनावरांना लगतच्या प्रांतात अवैध विक्री करिता नेण्यात येणार होते. जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पीएसआय शिवाजी टिपूर्णे यांनी पोलिस पथकासह त्याठिकाणी धाड टाकून मालवाहू वाहनाला ताब्यात घेत १४ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून सुटका केली. 
खडबडा मोहल्ला येथील ईदगाहच्या मागील भागातून गोवंश जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काल मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास नियोजनबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी धाड टाकली. तेथे एक मालवाहू वाहन पोलिसांना उभे दिसले. पोलिसांनी त्या मालवाहू वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये १४ गोवंश जनावरे कोंबून होती. कत्तली करिता लगतच्या प्रांतात त्यांची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले. पोलिसांनी मालवाहू वाहन ताब्यात घेतले असून वाहन मालक व इतर काही जण घटनास्थळा वरुन पळुन गेले, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १४ गोवंश जनावरे व एक MH ३४ AB २४७८ हे मालवाहू वाहन असा एकुण 4 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १४ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता करत त्यांना रासा गोरक्षण संस्थेकडे देण्यात आले. गोवंश जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी म.प्रा.स.का. १९७६ अंतर्गत कलम ५(अ)(ब),९, ९(अ), प्रा.छ.अ. १९६० अंतर्गत कलम ११(१)(क)(घ)(ड)(च)(झ) व मो.वा.का. च्या सहकलम १३०, १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, पीएसआय शिवाजी टिपूर्णे, पोउपनि हिरे, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना अशोक टेकाडे, गजानन भांदकर, हरिन्द्रकुमार भारती, पोकॉ. विशाल गेडाम, विजय राठोड, शुभम सोनुले, शंकर चौधरी, यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सुदर्शन वानोळे व वणी पोलिस स्टेशन करीत आहे.
गोवंश जनावरांच्या तस्करीचा डाव पोलिसांनी उधळला, खडबडा मोहल्ला येथे धाड टाकून १४ जनावरांची केली सुटका गोवंश जनावरांच्या तस्करीचा डाव पोलिसांनी उधळला, खडबडा मोहल्ला येथे धाड टाकून १४ जनावरांची केली सुटका Reviewed by सह्याद्री चौफेर on November 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.