Top News

शिवसेना प्रमुखांना काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने अभिवादन

सह्याद्री न्यूज | अतुल खोपटकर
 
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रात मराठी माणसांनाच हिण आणि उपरी वागणूक मिळत असताना, मराठी माणसांना महाराष्ट्रात मानाने जगण्यासाठी, ताठ मानेने उभं राहण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवून शिवसेनेची स्थापना केली व खुप मोलाचे मार्गदर्शन करून मराठी माणसाला एकत्र ठेवले.
आज, दिनांक १७ नोव्हेंबरला हिंदुस्थानचे हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांना स्मृतिदिन प्रित्यर्थ अभिवादन करण्यासाठी काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी मा. अरुणभाऊ आंब्रे (मा.शिवसेना विभागप्रमुख), शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सुनीताताई चव्हाण (मा. महिला शहर संघटक पि.चि.), विभाग संघटक प्रदीप बांद्रे यांची विशेष उपस्थिती या निमित्ताने होती.

या कार्यक्रमात सुनील तात्या पालकर, राजू रहाटे, बाळू ननावरे, अनिकेत आंब्रे, उपशहर प्रमुख सुधाकर नलावडे, राजेंद्र पालांडे, विलास निकम, भरत शिंदे, रामचंद्र उत्तेकर, कृष्णा निकम, पांडुरंग भांगे, जांभळे, किसन रेकटे, सहदेव कदम, सुंदर जोगदंड शिरीष घोडके, आदि उपस्थित होते.
Previous Post Next Post