सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
यावेळी वामनराव कासावार व इजहार शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर पारंपरिक गोंडी नृत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. वामनराव कासावार व मोरेश्वर पावडे यांनी बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी धोरणांविषयी माहिती दिली. बिरसा मुंडा कमिटीचे अध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील सात वर्षांपासून भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाज जागृती करणं हाच असल्याचे म्हटले. मान्यवरांच्या मनोगतानंतर राणी दुर्गावती डान्स ग्रुपच्या वतीने भव्य स्वरूपाचे पारंपरिक गोंडी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कोतरु, धनोडी या नृत्यांचा समावेश होता.
कर्यक्रमाचे संचालन संजय उरकुडे यांनी तर आभार प्रदर्शन बोबडे यांनी केले. यावेळी आयोजित बिरसा मुंडा जयंती सोहळ्याच्या या भव्य कार्यक्रमाला मारेगाव, पेटूर, मांजरी, विरकुंड, सुकणेगाव, रासा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कमेटीचे शंकर टेकाम, भालचंद्र मेश्राम, गणेश टेकाम, लेखन कनाके, छायाबाई मडावी आदींनी परिश्रम घेतले.
मोहर्ली येथे जननायक बिरसा मुंडा यांचा भव्य जयंती सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 17, 2021
Rating:
