नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते आदिवासी समाज भवन इमारतीचे भूमिपूजन संपन्न



सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : वरोरा शहरातील मध्यभागी असलेले कॉलरी प्रभागातील आदिवासी नियोजित जागेवर वरोरा शहराचे नगराध्यक्ष श्री.अहेतेशाम अली यांचा हस्ते जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडाजी यांच्या जयंती चे औचित्य साधून आदिवासी समाज भवन बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. नगर परिषद मार्फत आदिवासी सगा समाज बांधवांना समाज भवनचा रुपी भेट देऊन समाजातील लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाची लहर निर्माण झाली आहे. अहेतेशाम अली यांचे समाज बांधवांतर्फे आभार आणि सक्तार करण्यात आले.
सदर भूमिपूजन प्रसंगी श्री गजानन मेश्राम (विरोधी पक्ष नेते न.प.वरोरा), सौ.प्रणाली मेश्राम (नगरसेविका न.प.वरोरा), संदीप मेश्राम, कविश्वर मेश्राम, राजेन्द्र जुगनाकेजी, राहुल आत्राम, द्त्ताभाऊ गावंडे, अमर आत्राम, आनंद गेडाम, मारोती किन्नाके, सुरज पेंदोर, अतुल पेंदोर, माधव आत्राम, देवानंद मडावी उमेश मेश्राम, नागोराव सिडाम, प्रमोद पेंदोर, अविनाश मडावी, आशिष टेकाम, अभिषेक सोयाम, आकाश गावंडे, अशोक पंधरे, गणेश पंधरे, दिपक गेडाम, तसेच असंख्य आदिवासी सगा समाज बांधवांची या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपस्थिति होती.
नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते आदिवासी समाज भवन इमारतीचे भूमिपूजन संपन्न नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते आदिवासी समाज भवन इमारतीचे भूमिपूजन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on November 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.