सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : मूल तालुक्यातील बेंबाळ येथे आदिवासी समाजाच्या वतीने जननायक भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने (ता.१५) ला समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरहु कार्यक्रमाला बेंबाळ येथील व या परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रम यशस्वी केला.
दरम्यान,क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांनी सल्ला गांगरा शक्ती स्थळाचे अनावरण शंकररावजी शेडमाके यांच्या हस्ते केले. समाज प्रबोधन कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून दादाराव कुसराम, आदिवासी कवी सतीश मालेकर भामरागड, शिव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष चंद्रपुर, अनिल डहाके सामाजिक कार्यकर्ते चंद्रपुर, प्रशांत उराडे उलगुलान संघटना जिल्हा संयोजक या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदरहु कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेंबाळच्या सरपंच करुणा उराडे, उमाकांत मडावी, धर्मरक्षित घोनमोडे, दिवाकर कडस्कर, पवन नीलमवार, विजय बोम्मावार, प्रसाद कुसराम, संजय कोडापे, जीवनदास मडावी, नवनाथ मडावी, किशोर पगडपल्लीवार, श्यामराव कोडापे, मंदा शेमले, महादेव शिंदे, अर्चना मडावी, विकास वाळके, साईनाथ मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. विद्या शेडमाके यांनी केले तर अलिफ शेमले यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनशैलीवर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्त्यांनी आदिवासी समाजाची संस्कृती, बिरसा मुंडा यांचे कार्य, सध्याची आदिवासी समाजाची सामाजिक परिस्थिती येणारी संकटे व त्यावर उपाय अश्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साईनाथ मेश्राम यांनी केले या कार्यक्रमानंतर आदिवासी समाजाच्या युवक-युवतींनी नृत्य व गायन स्पर्धेत सहभाग घेऊन उपस्थित जनसमुदायांचे मनोरंजन केले. सदरहु कार्यक्रमाला गावातील व या परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाली हाेती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन मडावी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संतोष शेडमाके, समीर कुळमेथे, भारत मडावी, मनोज कोडापे, सुखदेव कोडापे, रामदास कुसराम, रंजीत गेडाम, निलेश शेडमाके तथा आदिवासी समाजातील युवकांनी अथक परिश्रम घेतले.
बेंबाळ येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 16, 2021
Rating:
