सह्याद्री न्यूज | विलास पिसे (नेरी)
चंद्रपूर : साेमवार दि.१५ नाेव्हेंबरला नवतळा येथे कांग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुक्काम करुन दि.१६ नाेव्हेंबरला भाजपच्या केंद्रातील मोदी सरकारचे जनविरोधी धोरण, वाढती महागाई, बेरोजगारी विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या निर्देशनानुसार जनजागरण कार्यक्रम तालुका काँग्रेस कमिटी चिमूरच्या वतीने चिमुर विधानसभेचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जन जागरण अभियान अंतर्गत आज नवतळा येथे रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
या वेळी चंद्रपूर जिल्हाचे प्रभारी तथा नागपूर नगर परिषेदेचे नगरसेवक,संजय महाकाळकर, चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजय घुटके, चिमूर तालुका कार्याध्यक्ष विजय गावंडे, कांग्रेसचे जेष्ठ नेते धनराज मालके प्रा.राम राऊत तालुका कांग्रेस कमिटी सचिव विजय डाबरे, चिमूर तालुका कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष रहेमान खा पठाण, चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक, चिमुर विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील, युवक कांग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले, मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख, ओम खैरे, विनोद भोयर नागपूर, विजयजी राऊत नागपूर, अजयजी जंगीडवार, रुपचंद शास्त्रकार, सुनील भजभूजे,कुंडलिक मेश्राम, तुळशीदास शिवरकर, दिलीप सूर,पुंडलिक गुरनुले, सुधीर पोहिनकर, जयद्रत खोब्रागडे, नाहेंद्र चट्टे, सुभाष बन्सोड, शुभम पारखी, अमोल जूनघरे, विलास मोहिनकर आदीं हजर हाेते.
काँग्रेस कमेटी तर्फे नवतळ्यातुन जनजागरण अभियानला आरंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 16, 2021
Rating:
