राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल करा - चिमूर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी


सह्याद्री न्यूज | विलास पिसे (नेरी)

चंद्रपूर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चिमूर क्रांती भूमीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या व खंजरीच्या माध्यमातून रनशिंग फुंकले, 'पथर सारे बाम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना' असे नारे लावून सन १९४२ मध्ये सर्वात पहिले चिमूर स्वातंत्र्य झाले.

देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, बालाजी रायपुरकर, भगतसिंग या सारख्या अनेक,महापुरुषांनी अगदी अल्प वयात देशासाठी घराचा त्याग करुन बलिदान दिले. परंतु कंगना अमरदीप राणावतला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्यानंतर कंगना राणावतने सन १९४२ मध्ये देशाला स्वातंत्र्य हे भिकेमध्ये मिळाले या देशाला खरे स्वातंत्र्य सन २०१४ नंतर मिळाले असे वक्तव्य करून देशाच्या सत्ताधीशांना खुश करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या स्वातंत्र्य लढण्यासाठी बलिदान देणांऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा अपमान करून देशातील व समाजातील लोकांना चीड आणणारे,संभ्रम तयार करणारे व शांतता भंग करणारे विधान केले कंगना अमरदीप राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा साेबतच सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. जाे पर्यंत पद्मश्री पुरस्कार परत घेत नाही ताे पर्यंत काँग्रेस आंदोलन करेल तदवतचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणे व कंगना अमरदीप राणावतचा पद्मश्री पुरस्कार मा.राष्ट्रपती यांनी परत घ्यावा. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणा-या स्वतंत्र वीरांचा सन्मान करावा अशी मागणी काँग्रेस
पक्षाकडुन करण्यात आली.

काल मंगळवार दि.१६ नाेव्हेंबरला चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिस स्टेशन चिमुरचे पाेलिस निरीक्षक यांना कंगना राणावतवर गुन्हा दाखल करण्यासाठी एक निवेदन दिले.

या वेळी प्रामुख्याने चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजय घुटके, चिमूर तालुक कार्याध्यक्ष विजयजी गावंडे, काँग्रेसचे जेष्ठ धनराज मालके, प्रा. राम राऊत, चिमूर पंचायत समिती उपसभापती रोषण ढोक, शहर अध्यक्ष अविनाश अगडे,राजु चौधरी, रुपचंद शास्त्रकर, नागेंद्र चट्टे, नाजेमा पठाण, अमोल जूनघरे, अनिल राऊत, विलास मोहिनकर आदीं उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल करा - चिमूर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल करा - चिमूर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी  Reviewed by सह्याद्री चौफेर on November 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.