सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : काल साेमवार दि.१५ नोव्हेंबरला स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालया समोरील बिरसा मुंडा चाैकात सायंकाळी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती अतिशय थाटात व उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रबोधन कार्यक्रम, भजन व स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले हाेते.
प्रारंभी सायंकाळी ५.०० वाजता वैशाली मेश्राम आणि त्यांचे चमुने बहारदार गोंडी भजनांचा कार्यक्रम सादर केला नंतर सायंकाळी ७.०० वाजता जेष्ठ पत्रकार किशोर भाऊ पोतनवार, यांचे अध्यक्षतेखाली प्रबोधन मेळाव्याला सुरूवात झाली. या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रपूरच्या मनपा महापाैर राखी कंचर्लावार, भाजपा शहर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, दलित पँथर सेना जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, दलित पँथर सेनाचे डांगे आदीं उपस्थित होते. महापाैर कंचर्लावार यांनी बिरसा मुंडा स्मारकाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल अशी ग्वाही या प्रसंगी बाेलतांना दिली. रूपेश निमसरकार यांनी सर्व सामान्यांनी राज्यकर्ती जमात बनुन आपले अधिकार हिसकावुन घेण्याचे आवाहन या कार्यक्रमातुन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक तुमराम यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन युवराज मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जितेश कुळमेथे, पुरूषोत्तम सोयाम, गोकुल मेश्राम, जमुना तुमराम, वैशाली मेश्राम, वामन गणवीर, रोशन देशभ्रतार, यांनी अथक परीश्रम घेतले . राष्ट्रगिताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
चंद्रपूरात जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 16, 2021
Rating:
