अल्पवयीन मुलीचे सतत शारीरिक शोषण करून केला गर्भपात; नंतर त्याने वर केले हात, प्रकरण आले पोलिसांत !

                       (File photo)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरातील एका अल्पवयीन मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण करून तिला गर्भवती करित तिचा गर्भपात करवून घेणाऱ्या तरुणाने नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने त्या तरुणाविरुद्ध वणी पोलिस स्टेशनला लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील रंगारीपुरा येथिल महाकाली मंदिराजवळ राहणाऱ्या पंकज गंगाधर लाकडे (२६) या तरुणाने तेथीलच अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वडगाव मार्गावरील झाडाझुडपात नेऊन वारंवार त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. १४ मे २०१९ पासून सतत तो तिचे शारीरिक शोषण करीत असल्याचे तिने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून म्हटले आहे. दरम्यान ती त्याच्यापासून गर्भवती राहिली. पण त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्याने त्या अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण सुरूच ठेवले. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तो तिचा शरीर संबंधासाठी वापर करू लागला. अशातच तिने लग्नाची गळ घातल्याने त्याने तिला नकार देत वाऱ्यावर सोडले. तिचा केवळ शरीर संबंधासाठी उपयोग करण्यात आल्याचे तिच्या लक्षात आल्याने तिने तिला गर्भवती करणाऱ्या त्या तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पंकज लाकडे याला तत्काळ अटक केली. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व भादंवि च्या कलम ३७६(३), ३७६(२)(J)(N) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करित आहे.
अल्पवयीन मुलीचे सतत शारीरिक शोषण करून केला गर्भपात; नंतर त्याने वर केले हात, प्रकरण आले पोलिसांत ! अल्पवयीन मुलीचे सतत शारीरिक शोषण करून केला गर्भपात; नंतर त्याने वर केले हात, प्रकरण आले पोलिसांत ! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.