सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
तालुक्यातील पळसोनी येथे राहणारा क्रिष्णा सचिन काकडे (१६) हा दहाव्या वर्गात शिकणारा अल्पवयीन मुलगा घरून शाळेत जाण्याकरिता नेहमी प्रमाणे ऑटोने निघाला. शहरातील एका खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळेत तो शिक्षण घेत होता. नेहमी तो १० वाजता घरून शाळेत जाण्याकरिता ऑटोने निघायचा, व ५.३० वाजता घरी परत यायचा. पण २३ नोव्हेंबरला बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याची चौकशी सुरु केली. गावातीलच ऑटोमध्ये बसून तो वणीला गेल्याने कुटुंबीयांनी ऑटो चालकाकडेही चौकशी केली. त्याने क्रिष्णाला साईमंदिर येथे सोडल्याचे सांगितले.
नंतर शाळेत जाऊन चौकशी केली असता वर्ग शिक्षिकेने तो आज शाळेत आलाच नसल्याचे सांगितल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोधाशोध घेतल्यानंतर रात्री ११.५७ वाजता त्याच्या काकाने वणी पोलिस स्टेशनला पुतण्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. तसेच त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशयही तक्रारीतून व्यक्त केला. नितीन मधुकर काकडे (३९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
(हाच तो हरवलेला मुलगा)
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात जमादार कांबळे करित आहे.
शाळेत जाण्याकरिता निघालेला अल्पवयीन मुलगा वाटेतूनच बेपत्ता
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 24, 2021
Rating:
