वरोरा येथील सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन समारंभ



सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : जिल्ह्या खनिज निधी अंतर्गत 10 लक्ष रुपये किंमतीचे सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन समारंभ नगराध्यक्ष अहेतेशाम अली व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या हस्ते टिळक वार्ड येथे पार पडले.

बूधवारी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास वरोरा येथील टिळक वार्ड परिसरातील ढवस ते कापसे यांच्या घरादरम्यानचा रोडचे भूमिपूजन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हाखनिज निधी चे सदस्य नितीन मत्ते यांनी सूचक वक्तव्य करत वरोरा शहरात शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाल्यास यापेक्षा अधिक ताकतीने काम करण्याचे आश्वासन जनतेला दिले. तर वरोरा न.प. चे विद्यमान नगरध्यक्ष अहेतेश्याम अली यांनी खानिज विकास निधी अंतर्गत शहरात रस्ते बांधकामाकरीता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

यावेळी या समारंभात नगराध्यक्ष अहेतेशाम अली, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेविका सुषमाताई भोयर, मुकेश जिवतोडे ,कॉन्ट्रॅक्टर सह वार्डातील मान्यवर उपस्थित होते.
वरोरा येथील सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन समारंभ वरोरा येथील सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन समारंभ Reviewed by सह्याद्री चौफेर on November 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.