कान्हाळगाव येथील शेतकरी महिलेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या


                         (File photo)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कान्हाळगाव (वाई) येथे राहणाऱ्या महिला शेतकरीने गावा शेजारी तुळशीराम मेश्राम यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या अंदाजे साडे अकराच्या दरम्यान, उघडकीस आली. 

विमल सिताराम कुळमेथे (60) असे शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिने विहिरीत उडी घेतली असल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी धाव घेवून या घटनेची माहिती मारेगाव पोलीस ठाण्यात दिली.  माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विमल यांच्या पाठीमागे पती, मुलगा असा आप्त परिवार आहे.
कान्हाळगाव येथील शेतकरी महिलेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या कान्हाळगाव येथील शेतकरी महिलेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या    Reviewed by सह्याद्री चौफेर on November 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.