सह्याद्री न्यूज नेटवर्क |
शेत कामासाठी एका मजुराला गावाकडे ट्रॅक्टरवर घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात एक जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने वेगाव परिसरात शोककळा पसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव (वेगाव) च्या रस्त्याच्या मधामध्ये असलेल्या पुलावरुन जात असतांना चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने रोटावेटर सहित ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कॅनलच्या नाल्यात कोसळला. यात मारोती वालकोंडावार (२४) हा जागीच ठार झाला तर, भारत बोथाडकर (२८) चालक हा गंभीर जखमी झाला असुन, जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. असुन पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याची तयारी सुरू होती.
रोटावेटर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात,१ ठार तर १ गंभीर जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 24, 2021
Rating:
