रजा मंजूर न करता परस्पर सुट्टीवर गेलेल्या सहा पटवा-यांना कारणे दाखवा नाेटीसा !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर तालूक्यातील गत काही दिवसांपूर्वी रजा मंजूर न करता परस्पर रजेवर गेलेल्या सहा तलाठ्यांना मंगळवार दि.२३ नाेव्हेंबरला तहसील कार्यालयाकडुन कारणे दाखवा नाेटीस पाठविण्यांत आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या तलाठ्यांनी व्हाटसअपच्या माध्यमांतुन सुट्टीचा अर्ज तहसीलदार यांचे कडे सादर केला हाेता. या तील दाेन तलाठ्यांनी फक्त तीन दिवसाची रजा मागितली हाेती पण प्रत्यक्षात ते तलाठी अधिक दिवस रजेवर असल्याचे कळते. दरम्यान आज दुपारी या प्रतिनिधीने चिमूर तहसील कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार तुलसीदास काेवे यांचेशी भ्रमनध्वनी वरुन संपर्क साधला असता तलाठी विलास नागपूरे, रितेश आमटे, अमाेल घाटे, चंदन करमरकर, वैभव कार्लेकर,तथा तुरारे यांच्या रजेच्या कालावधीतील वेतन राेखून ठेवण्यांत आल्याचे त्यांनी सांगितले. सदरहु तलाठी परस्पर रजा मंजूर न करता गाेवा सहलीला गेले असल्याचा आराेप माजी जि.प.सदस्य विलास डांगे यांनी या पूर्वीच केला हाेता. कास्तकारांचे अतिशय महत्वाचे काम साेडुन हे तलाठी आनंद उपभाेगण्यासाठी सहलीला गेले असल्याचे डांगे यांनी म्हटले हाेते. हे वृत्त लिहीपर्यंत संबंधित तलाठ्यांचे त्या कालावधीतील (सहा ते सात दिवसाचे) वेतन देण्यांत आले नव्हते. संबंधित तलाठ्यांना आता वैद्यकीय प्रमाण पत्रे जाेडल्या शिवाय रजा कालावधीतील वेतन मिळणार नाही हे ही तितकेच खरे आहे. तहसीलदार यांनी पाठविलेल्या कारणे दाखवा नाेटीसांना उपरोक्त तलाठी का उत्तर देतात या कडे सा-या महसूल विभागातील कर्मचा-यांसह तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे. तदवतचं या भागात सहा तलाठ्यांच्या या गाेवा सहलची चर्चा अद्यापही बरीच रंगू लागली आहे. 
रजा मंजूर न करता परस्पर सुट्टीवर गेलेल्या सहा पटवा-यांना कारणे दाखवा नाेटीसा ! रजा मंजूर न करता परस्पर सुट्टीवर गेलेल्या सहा पटवा-यांना कारणे दाखवा नाेटीसा ! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.