सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : वर्षभर आपल्या वृत्तपत्र/माध्यमांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांना जाहिरातीच्या रुपात दिवाळीत थोडा आर्थिक आधार मिळतो. पण पोर्टल मीडियाचे स्तोम माजल्या पासून पत्रकारांची संख्या हनुमानाच्या शेपटी सारखी वाढतच आहे. जाहिरातदारांचा ठराविक पेकेज आणि जाहिरातीसाठीच्या निवेदनाच्या संख्येची गर्दी यांचा मेळ बसवंतांना त्यांच्या मेंदूच्या ठिकऱ्या उडतात आणि दरवेळी मिळणारी सन्मानजनक जाहिरात निराशेत पररावर्तीत होते. वर्षभर राबणारा पत्रकार निराश हाताने परततो,आणि ज्यांना पत्रकारितेतील एबीसीडी समजत नाही ते तीनशे,पाचशे रुपये फुकटचे मिळाले म्हणून खुश होऊन पुढल्या टार्गेट कडे वळतात...सारेच तशे नाहीत,काही २४ तास अलर्ट असणारे न्यूज पोर्टल,युट्युब चॅनलही आहेत. जे पत्रकारितेचा दर्जा टिकवून आहेत. पण ज्यांना साधा अर्ज लिहिता येत नाही ते पत्रकार दिवाळीत स्वतःच्या नावाचीच पत्रके काढून पैशांचा 'जोगवा' मागतात त्यांचे काय करायचे? दर दिवाळीत येणारी पत्रकारांची भरती आहोटी कोण थोपवून धरील? शंभर,दोनशे किंबहुना एक 'नाईनटी' साठी पत्रकारांना बदनाम करणाऱ्या हरामखोरांच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी स्वीकारेल कोण?दिवाळी गेली की अलगत ही भरती आहोटी ओसरते. आणि वर्षभर राबणारे 'बिचारे' पत्रकार पुन्हा बदनाम झालेला चौथा स्तंभ सावरत आपापल्या कामाला लागतात....
वर्षभर प्रत्येक तालुक्यात बोटावर मोजण्या इतकेच पत्रकार वर्षभर सक्रिय असतात. मात्र दिवाळीत अचानक पत्रकारांचे पीक येते कुठून?
खरंतर या एकूण प्रकाराने जाहिरात देणारी नेते मंडळी,कंत्राटदार,व्यवसायिक,व संबंधित जाहिरातदार पूर्णतः चक्रावले असून,ऐन दिवाळीत एवढ्या संख्येने पत्रकारांचा जन्म होतो कसा;यावर चिंतन आणि मंथन,संशोषण करीत असले तरी,हे 'दिवाळी छाप' पत्रकार एखाद्या बार मध्ये चिकन मटनावर ताव मारत आपली दिवाळी साजरी करत असतात. याचे शल्य मात्र प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येकालाच आहे,आणि राहील..! कारण संसर्गजन्य बुरशी सारखे ऐन दिवाळीच्या तोंडावर जाहिरात दर पत्रक वाटत फिरणारे हे तथाकथित पत्रकार वर्षभर कुठेच दिसत नाहीत. आणि हा एकूण प्रकार खपवून घेतल्या शिवाय कुणाला कुठलाही पर्याय नसल्याने या "दिवाळी छाप" पत्रकारांचे फावले आहे. यावर पुढल्या दिवाळी पर्यंत वर्षभर राबणाऱ्या पत्रकारांनी काही उपाययोजना करावी,एवढंच!
- नरेंद्र सोनारकर
विदर्भ अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ
संपर्क : ९११२३१६६४५
प्रत्येक दिपावलीत प्रगटणांऱ्या हंगामी पत्रकारांवर काेण अंकुश लावेल ?
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 07, 2021
Rating:
