सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
सविस्तर वृत्त असे कि, ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी पाणपट्टी व इतर कर हे ग्रामपंचायत चे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेंतर्गत निधी मिळत असतो. निधी मिळत असला तरी, तो त्या योजनांवर खर्च करावा लागतो. मग गावातील इतर कामांसाठी निधी येणार कुठून? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
अहो आश्चर्यम की आपल्या मच्छिन्द्रा गावात फक्त १० टक्केही मालमत्ता कर जमा झालेला आहे. असे ग्रामपंचायत चे कर्मचारी सांगतात. रोज गावात पाणी पुरवठा करणे, पाणी पुरवठ्याची दुरूस्तीची कामे करणे, विज बिल भरणे, कर्मचारी पगार काढणे, गावातील स्वच्छता, गटार काढणे, किरकोड कामे अशी अनेक प्रकारची कामे असतात. अशी कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्नाची गरज असते. ग्रामपंचायतीच्या कर वसूलीतून आर्थिक वर्षांची कामे करावी लागतात. मालमत्ताधारक कर भरत नसेल तर गावातील कामे होतील कसे याचे आत्मपरीक्षण लोकांनी करायला हवे.
ग्रामपंचायत ही संस्था आहे आणि जनता ही संस्थेची शाखा आहेत. शाखेमधुन उत्पन्न नाहीच तर शाखांची गरज भागेल कशी याचा विचार व्हायला हवा. आमच्याकडे ज्यावेळी लोकं इतर दाखले किंवा उतारे काढण्यासाठी येतात त्यावेळी आम्ही घरपट्टी पाणपट्टी भरण्यासाठी आमचा नागरीकांना नेहमी आग्रह असतो. जर नागरीक प्रामाणिकपणे कर भरत असेल तर आमच्याकडून कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही. कर न भरल्यामुळे कराची रक्कम तर वाढते पण त्यामागे दंडही वाढत जातो. आणि जप्तीही होवू शकते. आणि शेवटी कराची रक्कम भरावीच लागते.
तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) २०१५ मधील तरतुदीनुसार मालमत्ताधारकाला ग्रामपंचायत कर हा भरावाच लागतो. तो कधीही माफ होत नाही. उलट यावर ५ टक्के दंडही द्यावा लागतो. जर आपण आपला कर आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महीन्याच्या आत भरला तर ५ टक्के सुट्टी सुद्धा मिळते. मार्च पर्यंत भरला तर दंडही लागत नाही.
ज्या गावात लोक स्वच्छेने ग्रामपंचायत कर भरतात ते गाव नक्कीच प्रगतीपथावर असते. हे कुणाला सांगण्याची गरज नाही. कराच्या रूपात आपल्या मच्छिन्द्रा ग्रामपंचायतील आर्थिक बळ द्यावा. आणि एक समक्ष गावाची निर्मीती करा.
"चला तर मग आपण सगळे मिळून ग्रामपंचायतीचा कर भरूया - ग्रामपंचायत आणि आपले गाव अधिक समक्ष करूया."
महिना होत आहे गावातील नळ योजना बंद आहे. ऐन कामाच्या वेळातच नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने गावातील महिलांची पाण्यासाठी वाणवा आहे. मजुरीची वेळ असल्याने तात्काळ नळ योजना सुरु करावे - गावकरी
ग्रामवासियांनी घरपट्टी पाणीपट्टी भरावा - मच्छिन्द्रा ग्रामपंचायत चे आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 07, 2021
Rating:
