सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : वर्तमान पत्र वाटून शिक्षण घेणार्या राणी सुशील रोहने या युवतीचे मनापासून अभिनंदन ! शिक्षणाचे जीवनातील महत्त्व काय हे लक्षात आल्यावर शिक्षणासाठी तेलंगणा राज्यातून येऊन कठोर परिश्रम घेत आपल्या जीवनात यशोशिखर गाठण्यासाठी राणीची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या राणीने ग्रामगीतेचे वाचन करत श्लोक, अभंग याची आवड निर्माण केली ही बाब अभिमानास्पद कौतुकास्पद आहे. समाजातील महिला व युवतींशी नाते जोडत आपली वाटचाल करत आहे. तिच्यात पावलागणिक दृढ विश्वास निर्माण व्हावा व यशाची उंच गगन भरारी मारण्याचे बळ तिच्या अंगी यावे, पुढील यशस्वीतेसाठी राणीला शुभेच्छा!
~ कुसुम ताई अलाम
माजी जि.प.सदस्या व साहित्यिका, गडचिराेली
राणी तुझ्या जिद्दीला यशाचे पंख फुटावे - कुसुम ताई अलाम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 07, 2021
Rating:
