श्रमदानातुन निर्माण केला मोरवा येथे वनराईबंधारा

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : येथील जेष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरचे कोषाध्यक्ष रामस्वामी कापरबोइना (माजी कृषी अधिकारी) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जानवे उपाध्यक्ष तसेच मोरवाचे भूतपूर्व सरपंच श्यामकांत थेरे सचिव दीपक जेऊरकर यांच्या पुढाकाराने तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, पर्यवेक्षक संदीप दातारकर, मोरवा येथील सरपंच भूषण पिदूरकर व भगवती पिदूरकर, गणेश ताजने, शत्रूघ्न उमाटे, अंकुश चौधरी यांच्या सहकार्याने माेरवा येथे
वन बंधारा बांधण्यात आला.
या श्रमदानात जेष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या पदाधिकारी व सदस्यांचा सक्रिय सहभाग होता. सदरहु व्हॉलीबॉल संस्थेचे पदाधिकारी नरेंद्र कुंभारे, अरुण येरावार, दत्ता कडुकर, सिध्दार्थ वाघमारे, अमित दिकोंडवार, कमलाकर जोगी, मुन्ना ठाकूर, डॉ. किशोर जेणेकर, संतोष बोरीकर, सचिन भिलकर, राजीव चौधरी, अरविंद बुरडकर, प्रवीण चवरे,व निकेश पिदूरकर यांनी बंधरा बांधण्यांत अथक परिश्रम घेतले.
श्रमदानातुन निर्माण केला मोरवा येथे वनराईबंधारा श्रमदानातुन निर्माण केला मोरवा येथे वनराईबंधारा Reviewed by सह्याद्री चौफेर on November 07, 2021 Rating: 5
Powered by Blogger.