सह्याद्री | किरण घाटे
चंद्रपूर : गडचिरोली मधील बळीराजा पॅलेस येथे दि.६ नाेव्हेंबरला सत्यशोधक चळवळीचे अग्रणी असलेले अभ्यासू व विचारवंत नागेश चौधरी यांच्या बहुजनांचा सामाजिक सांस्कृतिक एल्गारचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प.सदस्या तथा महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कृत साहित्यिका कुसुम ताई अलाम यांनी विभूषित केले हाेते. बटू वामनाचे रुप घेऊन बळीराजाला पाताळात गाडले. नैऋती नावाची बीजमाता धान्याचा शोध लावणारी मातृसत्ता हिच्या कडून बळीराजाने गुण घेतले होते. मातृसत्ता ही समानता,कल्याणासाठी, संरक्षण देणारी असते त्या मातृसत्तेचे गुण बळीराजा मध्ये होते. म्हणजे ते प्रजा हितदक्ष होते. त्यामुळे त्यांचा बळी गेला,हा सांस्कृतिक संघर्ष आहे. आदिवासींसोबत हा सांस्कृतिक संघर्ष दिसतो. अयोध्येतील राम मंदिराच्या साठी आदिवासीच्या पवित्र स्थळांची माती प्रतिकात्मक रुपात जात आहे. बळीराजाचाआजही बळी दिला जात आहे हे दिल्लीतील आंदोलनातून दिसते. असे विचार अलाम यांनी आपल्या भाषणातून या वेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार (द हितवाद) राेहीदास राऊत, जेष्ठ समाजसेवक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलासराव निंबाळकर हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. यांचे ही यावेळी भाषणे झाली. प्रा .संतोष सुरडकर यांनी आपल्या सुरेल आवाजातील क्रांतीगीत गायले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मानंद मेश्राम यांनी केले. अशोक मांदाळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. उपस्थितीतांचे आभार प्रवृत्ती वाळके यांनी मानले. या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभली हाेती.
सत्यशाेधक चळवळीचे नागेश चौधरी यांच्या "बहुजनाच्या सामाजिक - सांस्कृतिक एल्गारचे" गडचिराेलीत प्रकाशन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 07, 2021
Rating:
