एसटी कर्मचारी वर्गांच्या रास्त मागण्यांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे येत्या १० नाेव्हेंबरला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणा आंदोलन
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ हा भारत सरकारच्या श्रमिक मंत्रालयाकडुन नाेंदणीकृत असून राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संघटन विरहित कर्मचाऱ्यांचा गेल्या एक आठवड्यापासून आपल्या न्याय मागण्यांसाठी संप सुरू आहे.दरम्यान राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखा महाराष्ट्रच्या वतीने एस.टी. महामंडळातील कामगार, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आणि अधिकारां करीता रस्त्यावरची लढाई मागील एक वर्षांपासून सुरु असल्याचे दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य शाखा आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखा महाराष्ट्र च्या वतीने दोन चरणातील आंदोलन दिनांक 3 नोव्हेंबर 2021 पासून दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पर्यंत काळीफीत लावून करीत आहे. या शिवाय दिनांक 10 नोव्हेंबरला एकाच दिवशी राज्यातील 36 ही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन करण्यांत येणार असल्याची माहिती प्रा.सुचिता खाेब्रागडे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीस दिली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विलनिकरण महाराष्ट्र राज्य शासनात त्वरित करा. 2) आत्महत्या केलेल्या ST कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पन्नास लाख रुपये त्वरित देऊन परिवारातील एका सदस्याला महिन्याभरात नोकरी द्या. 3) एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे थकीत करारासह पुढील करार त्वरित करा. 4) अन्यायकारी शिस्त व आवेदन प्रणाली त्वरित रद्द करा. 5) कर्जबाजारी केलेल्या एस.टी. महामंडळातील कामगार कर्मचाऱ्यांचे ST कोपरेटिव्ह बँकेचे कर्ज माफ करा आदीं त्यांच्या प्रमुख मागण्या आहे.
सन 2013 मध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की, आमची सत्ता महाराष्ट्रात आल्यास एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्यात येईल, सन 2014 ते 2019 पर्यंत भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीचे सरकार सत्तेवर असतांना एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण का केले नाहीत? सन 2016 ला असेच ऐन हंगामाच्या वेळी याच मान्यताप्राप्त आणि कृती समितीने कोणत्याही संपाची नोटीस न देता बेकायदेशीर 2 दिवशीय संप घडवून आणला होता, त्याच पद्धतीने सन 2017 ला 4 दिवशीय संप घडवून आणला होता,या दोन्ही संपाच्या वेळी भाजपाचे सरकार सत्तेत असतांना कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. मग आता भाजपाचेच बांडगुळ आमदार हे एस.टी. कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर संप करायला लावून दिशाभूल करीत आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांनी ही बाब लक्षात घेता या वर गांभीर्याने चिंतन व समिक्षा करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.असे उपरोक्त संघटनेने प्रसिध्द केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.
एस.टी. महामंडळातील काम करणांऱ्या कर्मचा-यांना आवाहन करण्यात येते की, आत्महत्या न करता धैर्याने, संयमाने आपले एस.टी. महामंडळ राज्य शासनात विलनीकरण करण्यासाठी आणि इतर संविधानिक न्याय, हक्क अधिकारासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनची MSRTC या विंग सोबत राहून दोन्हीही टप्प्यातील काळीफीत आंदोलन आणि जिल्हास्तरीय धरणा आंदोलन यशस्वी करण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे.
सदरहु आंदोलनात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुमराम, प्रा. कविता चंदनखेडे, मनोहर बांदरे, डॉ .गौतम नगराळे, रामाराव धारने, के .एस. पडवेकर, आनंदा गावंडे, डॉ. ज्योत्स्ना भागवत, किसन बावने, धनराज दुर्योधन, गिरीश चन्ने, धमु नगराळे, आदीं सहभागी हाेणार आहे.
एसटी कर्मचारी वर्गांच्या रास्त मागण्यांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे येत्या १० नाेव्हेंबरला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणा आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 07, 2021
Rating:
