सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरी केली जाते. शहरातील मॅकरून स्टुडंट अकॅडमी (सी.बी.एस.ई.) या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस बालक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांमध्ये नेहमी रमणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जाते. मुलांची गोडी असलेले चाचा नेहरू मुलांच्या नेहमी स्मरणात राहावे, याकरिता शाळांमध्ये त्यांची जयंती बालक दिवस म्हणून साजरी केली जाते. मॅकरून शाळेत त्यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना काही भेट वस्तू व चॉकलेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅकरून शाळेच्या प्राचार्या शोभना मॅडम या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मॅकरून प्रायव्हेट आयटीआय चे मुख्याध्यापक दामले उपस्थित होते. प्राचार्या शोभना मॅडम यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, विद्यार्थ्यांनी मन आणी बुद्धी यांच्यात मेळ साधून योग्य तोच निर्णय घ्यावा व विद्यार्थी दशेपासूनच यशस्वी जीवनाची पायाभरणी करावी. यावेळी उपस्थित काही शिक्षकांनीही आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलीमा सुत्रावे यांनी तर आभार प्रदर्शन कुरील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मॅकरून इंग्रजी माध्यमिक शाळेचे निखिल घाटे, शामली चौधरी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.