आरोग्य उपकेंद्र जारीदा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरीकांचे ८० टक्के लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण


सह्याद्री न्यूज नेटवर्क |

चिखलदरा : चिखलदरा तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र जारीदा येथील आरोग्य कर्मचारी यांनी मोठे यश प्राप्त केले आहे.मेळघाट हा भाग अतिदुर्गम व डोंगराळ भाग आहे. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकं अंधश्रध्दा वर विश्वास ठेवतात. कोरोना लसीबद्दल मेळघाटातील लोकांच्या मनात उदासीनता होती. अफवा वर जास्त प्रमाणात लोकांचा विश्वास होता. या कारणामुळे लोक कोरोना लस घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. डॉ. अजय ठोसरे सामुदायिक आरोग्य अधिकारी आरोग्य उपकेंद्र जारीदा, श्री.डी. एन. तायडे आरोग्य सेवक, श्रीमती एस.एस.बन आरोग्य सेविका यांनी प्रत्येक गावात जाऊन लशीकरन बदल जनजागृती केली. आज या जनजागृती मुळे आरोग्य उपकेंद्र जारीदा अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांचे ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. या कामगिरी मुळे श्री.जयंत बाबरे गटविकास अधिकारी चिखलदरा व श्री.सतीष परधान तालुका वैदयकीय अधिकारी यांनी मेहरियाम या गावात भेट देऊन आरोग्य कर्मचारी यांना फुल देऊ अभिनंदन केले. आदिवासी क्षेत्रात काम करताना कर्मचारी यांना अनेक अडचणींच्या सामना करावा लागतो. या सर्व समस्या वर मात करून आरोग्य कर्मचारी यांनी कौतुकाचे काम केले आहे.मेळघाट मध्ये असे अनेक गावे आहेत की,लोकांचा मनात कोरोना लस बदल उदासीनता आहे.

प्रत्येक उपकेंद्र कर्मचारी यांनी कोरोना लशी बद्धल जनजागृती केली तर, कोरोना लक्षीकरणाचा वेग वाढेल. लसीकरण करण्यासाठी डॉ. अजय ठोसरे, डॉ अंकित राठोर, डी. एन. तायडे, श्रीमती एस.एस.बन, एन. ढोकणे, श्रीमती रविना नागले, कु.प्रिती बेलकर, कु.हर्षा बेलकर, कु.प्रेरणा सेमलकर याचा सिंहाचा वाटा आहे. तसेच गावातील सखाराम धिकार, शंकर धिकार, हिरालाल आठोले, ताडील तलाठी, चव्हाण ग्रामसेवक व गावातील लोकांचा सहकार्य मिळाले.



"गावातील लोकांचा सहकार्य मुळे आज माझा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांचे ८०% लशीकरन पूर्ण झाले आहे.व माझे सहकारी कर्मचारी यांनी मला वेळोवेळी साथ दिली.माझा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांचे लवकरात लवकर १००% लशीकरन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे."

डॉ. अजय ठोसर 
(आरोग्य सामुदायिक अधिकारी,जारीदा)
आरोग्य उपकेंद्र जारीदा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरीकांचे ८० टक्के लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण आरोग्य उपकेंद्र जारीदा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरीकांचे ८० टक्के लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण Reviewed by सह्याद्री चौफेर on November 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.