न्याय देणारा 'हा' जय भीम ..!

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

काल बहुचर्चित जय भीम चित्रपट पाहिला...चित्रपटच्या सुरवातीपासूनच मनाच्या संवेदशील कोपऱ्यात द्वेष,राग या भावनांचा प्रवाह वाहायला लागतो.. जसे जसे सीन्स पुढे सरसावु लागतात तसे तसे विचार,मन सर्व प्रशासकीय व्यवस्थेकडे, न्यायवाटेकडे ,समाजातील शून्य झालेल्या मानसिकतेकडे अश्या दृष्टीकोनाने बघायला लागतात की आपण 'का' आहोत या प्रश्नचिन्हाचे उत्तर शोधायला निघावंस वाटत...एका क्षणाला तर व्यवस्थेसाठी माणसे आहेत की माणसांसाठी व्यवस्था आहे हेच डोक्यात फिरत राहत. न्यायहक्कांचे संरक्षणकर्ताचं (पोलीस इत्यादी) जेव्हा सत्याची फाशी बांधतात त्यावेळी मात्र मन सुन्न होत... माणसे असून जनावरप्रमाणे जगायला लावणं ... अन्याय अत्याचाराची पूर्ण समाजास किती झळ पोहचते अन समाजातील उच्चभ्रू समाजास वाचवण्यासाठी जेव्हा यांचा बळी दिला जातो याचे चित्रण या चित्रपटात हुबेहूब करण्यात आलंय...
पत्रकारिता करतांना निदर्शनास आलेल्या अश्याचं काही घटनांची आठवण झाली...राजकन्नू चे हालाहाल झालेले मृत शरीर जेव्हा रस्त्याच्या कडेला फेकले जाते आणि नको तो त्रास असह्य अत्याचार नुसतं असत्याला विजयी करण्याची केला जातो ...यावर आम्ही किती सत्याचे पालनकर्ता असे दाखवणाऱ्या धर्माग्ध टाकळी अन न्यायहक्कांचे सांभाळ करणारे (पोलीस इत्यादी) स्वतःला श्रेष्ठ अतिश्रेष्ठ समजून घेताय...आणि हे नुसतं चित्रपटात नसून रोजच्या आयुष्यात दिसून येत.. उत्तर प्रदेशातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून 'याच' पालनकत्यांनी करफू लावत असत्याचे सत्य केले... इथंही कोणी 'चंन्दृ ' असायला हवा होता...मात्र एक नक्की ..! की जय_भीम म्हणजे काही जात नाही तो विचार आहे ...मानवी हक्क, निडरता आणि संविधान आहे...संविधान जेव्हा एका सामान्य माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे राहते, तेव्हा भ्रष्ट व्यवस्था त्याच्या पायाशी कशी लोळण घेते हा अंगावर काटा आणणारा संगिनी आणि तिच्या मुलीला घरी सोडायला येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा प्रसंग खूप चांगल्या प्रकारे सांगून जातो...चित्रपटातील एक एक क्षण शिकणारा आणि शिकवणारा भासतो... शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देणारी चित्रपटाच्या अगदी शेवटची फ्रेम हा या चित्रपटाचा कळस आहे...अगदी चाचपडत पेपर हातात घेऊ पाहणारी ती चिमुरडी जेव्हा चंद्रुच्या इशाऱ्यानंतर अगदी आत्मविश्वासाने खुर्चीवर बसते तेव्हा तिच्या डोळ्यातली चमक ही आपल्या सर्वांसाठी आशादायक आहे...!

चित्रपटातील कलाकार माझ्या शब्दांत...

१.सत्य हेच सत्य असं मरेपर्यत सतत बोलणारा आणि गरिबीतून सुद्धा पत्नीला राणी म्हणून वागवणारा राजकन्नू .. 

२.अर्धांगिनी ! आपल्या पतीसाठी कुठल्याही परिस्थितीत स्वाभिमानाने लढणारी आणि भ्रष्ट व्यवस्थेला पायाखाली दाबणारी संगिनी...तिला पाहतांना संवेदनशील मन हे खूप व्यथित होत.

३.परिस्थिती किती वाईट आहे हे समजून घेत रुपयांना धुतकरणारा आणि खरा न्यायहक्कांचा पालनकर्ता कसा असायला हवा याच उदाहरण असणारा पेरूमल्लसमी ... (IG)

४.या सर्वांना विसंगत असणारा पोलीस स्टेशन मध्ये महिलेला विवस्त्र करणारा आणि संस्कार चव्हाट्यावर मांडणारा भ्रष्ट_कर्मचारी ...

५.अगदी शेवटी.. खुर्चीवर बसून अंधारमय भविष्यात ज्ञानाचा दिवा पेटवणारी ती इवलुशी मुलगी.. 

६. सर्वात महत्वाचा आणि संपूर्ण प्रसंगाचा कणा म्हनजे जिंकण्या - हरण्या पलीकडे उच्चभ्रू अन न्यायव्यवस्थेला न्यायाच्या रस्त्याने झुकवणार ... चंदृ ! न्याय देणारा हा जय भीम.

७.या सर्वांमध्ये , चित्रपटातील विचारांमध्ये ठासून भरलेले.. न दिसणारे पण प्रत्येक क्षणी भासणारे ,अत्याचारातून मुक्त करण्यासाठी संविधान बनवणारे डॉ.बाबासाहेब! थोडक्यात पण काळजाला चररर... करणारे जय भीम

 या सर्वांमधून शिकण्यासारखे बरेच आहे..शिकत राहा .जातींचे लेबल काढून बघत असाल तरचं बघा...अशी कळकळीची विनंती..! jaybhim हे घोषवाक्य नसून लढा आहे..!

तुम्ही जय भीम बोलण्यापेक्षा जय भीम जगायला शिका..! 

~तेजल पाटील
खामगाव
न्याय देणारा 'हा' जय भीम ..! न्याय देणारा 'हा' जय भीम ..! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.