सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी नुकतीच बल्हारपूर तालुक्यातील माैजा जाेगापूर येथील नामे सुधाकर उमरे यांचे मालकीच्या ग.न.२२\२ या शेताला प्रत्यक्ष भेट देवून शेतातील खरीप हंगाम धान पीक कापणी प्रयाेगाचे पर्यवेक्षण केले. या वेळी कृषी सेवक अहिरराव व साजाचे तलाठी खरुले प्रामुख्याने उपस्थित हाेते.
दरम्यान याच जिल्ह्यातील काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी रँडम पध्दतीने निवडलेल्या काही शेतात प्लॅन्ट टाकले. चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी,नायब तहसीलदार यांनी जिल्ह्यातील खरीप पीक कापणी प्रयाेगांचे पर्यवेक्षण केले आहे.
बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी केले पीक कापनी प्रयाेगाचे पर्यवेक्षण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 12, 2021
Rating:
