वाहन चोरी करणारी बंटी बबली टोळींचा पर्दाफास, 11 दुचाकी गाड्या हस्तगत


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शहरातून बरेच दिवसापासून दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी चंद्रपूर यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडीस आणण्यासंबंधाने स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देऊन दुचाकी वाहन चोरीस आळा घालून गुन्हे उघडीस आणण्या संबधी मार्गदर्शित केले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहर परिसरात एक इसम काळ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड दुचाकी घेऊन विक्री करीता ग्राहक शोधत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली असता, त्या दुचाकी चोरट्यास सापळा रचून ताब्यात घेऊन त्याचे जवळील दुचाकीची तपासणी केली असता, सदर ची गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने व त्याचे साथीदाराने यापूर्वी ऐकूण 11 मुपेड गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरी करण्याची पद्धती बाबत विचारणा केली असता, ते गाडी ठेवणाऱ्या इसमावर लक्ष ठेवत असत व तो दुचाकी धारक गाडी ठेवून जात असतांना त्यावर लक्ष ठेवून आरोपी व त्याची मैत्रीण ती दुचाकी गाडी धक्का मारून थोडे दूर घेऊन जाऊन चोरीचे गाडीवर त्याची मैत्रीण स्वतः गाडी बसत व तीचा सहकारी आरोपी हा त्याचे गाडीने त्या चोरीचे गाडीला धक्का मारून (टोईंग करून) ती गाडी ते ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाऊन ठेवत असत व त्यांचा तिसरा साथीदार हा सदरच्या चोरीच्या गाड्याचे नंबर प्लेट बदलवून व गाड्याच्या डुप्लिकेट चाव्या तयार करून त्या विकण्या करीता ग्राहक शोधात होते.
सदर गुन्ह्यात आरोपीतांकडून पो स्टे रामनगर येथील ऐकूण 5 गाड्या, पो स्टे चंद्रपूर शहर येथील 3 गाड्या, पो स्टे बल्लारशहा येथील 1 गाडी तसेच ईतर 2 दुचाकी वाहन अशा ऐकूण 11 दुचाकी मोपेड गाड्या अंदाजे किंमत ऐकूण 6,30,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सपोनि जितेंद्र बोबडे, पो.उप.नि. सचिन गदादे, पो हवा. संजय आतुकुलवार, पो कॉ नितीन रायपुरे, गोपाल आतुकुलवार, कुंदन बावरी, प्रांजल झिलपे,रवींद्र पंधरे, मपोशि. अपर्णा मानकर, यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरु आहे. 

वाहन चोरी करणारी बंटी बबली टोळींचा पर्दाफास, 11 दुचाकी गाड्या हस्तगत वाहन चोरी करणारी बंटी बबली टोळींचा पर्दाफास, 11 दुचाकी गाड्या हस्तगत Reviewed by सह्याद्री चौफेर on November 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.