Top News

परत एका शेतक-याने आपली जीवन यात्रा संपविली


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : सततची नापिकी व डाेक्यावरील वाढता कर्जाचा बाेझा सहन न झाल्यामुळे परत एका शेतक-याने विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम राजूरा तालुका अंतर्गत येत असलेल्या सिंधी या गावात घडली.

साेमा मल्ला दामेलवार असे आत्महत्या करणा-या या शेतक-याचे नाव असुन, त्याने स्व:मालकीच्या शेतात विष प्राशन केल्या नंतर त्यास दि.८ नाेव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. परंतु डॉक्टर मंडळी कडुन उपचार सुरु असतांनाच त्याची प्राणज्याेत मालवली. त्याचे कडे बँकेचे कर्ज असल्याचे गावात बाेलल्या जाते.
Previous Post Next Post