सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : येथील स्थानिक शासकीय विश्राम गृहात नुकतेच चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांना स्टेज डेरिंग यावे व त्यांना व्यवस्थित भाषण करता यावे ह्या करिता वक्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यांत आले होते. या वक्ता प्रशिक्षण शिबिराला उद्घाटक म्हणून आमदार चंद्रिकापुरे लाभले होते तर, प्रमुख उपस्थितीत विदर्भ निरीक्षक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वर्षाताई निकम उपस्थित होत्या. शिबिराचे मार्गदर्शक म्हणून राजेश पेचे यांची उपस्थिती होती.
सदरहु वक्ता प्रशिक्षण शिबीरात शहरातील २० पदाधिकारी प्रशिक्षण घेणार होते तदवतचं २० पदाधिकारी ऑब्झरवर म्हणून प्रशिक्षण घेणार होते. वक्ता प्रशिक्षण शिबीर या वेळी 3 टप्यात घेण्यांत आले. त्या नंतर प्रशिक्षण घेणांऱ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक पेचे ह्यांनी भाषण देताना कसे उभे राहायचे, देह रचना कशी असली पाहिजे ह्या बाबत सविस्तर माहिती दिली. वक्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजक शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी प्रास्ताविक केले.
या वेळेस विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर्, धनंजय दानव, शालिनी महकुलकर, चारुशीला बरसागडे, रामगुंडे आरिकर, विभागीय अध्यक्ष मेघा रामगुंडे,विनोद लाभाणे, वैष्णवी देवतळे, दीपक गोरडवार,तसेच विद्यार्थी म्हणून शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितीतांचे आभार मेघा रामगुंडे यांनी मानले. शिबिरात अनेकांची उपस्थिती लाभली हाेती.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वक्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2021
Rating:
