सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई : मी मंत्रालयात जात नाही घरातून काम करतो, अशी सातत्याने ओरड करणाऱ्यांना माझा सवाल आहे. त्यांनी मंत्रालयात जाऊन काय दिवे लावलेत? हे सर्वांना माहिती आहे.त्यामुळे घरून काम होत असेल तर मंत्रालयात पाट्या टाकण्याची गरज काय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी थेट भाष्य न करता फोडा काय बॉम्ब फोडायचे ते. पण पाकिस्तानला कधी फोडणार ते सांगा असा सवाल केंद्र सरकार ला विचारला आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने पत्रकारांसोबत आयोजित स्नेहभोजनदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनौपचारिक गप्पामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या दीड वर्षाच्या काळात जनतेच्या हिताची कामे करतांना अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत.
मात्र, तरीही विरोधक मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत. कामे होत नाहीत. अशी ओरड करतात. मात्र जे लोकं मंत्रालयात येत होते, त्यांनी काय दिवे लावले आहेत. हे मी बघतच आहे. त्यामुळे मंत्रालयात येऊन पाट्या टाकण्यापेक्षा जनतेच्या हिताची कामे जर घरातून होत असतील तर त्यात काय चूक आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी बोलताना उपस्थित केला. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालाच आहे. मात्र जे मुस्लिम आरक्षण मागत आहे. त्याबाबत केंद्र सरकारने विचार करणार की नाही हे स्पष्ट करावं असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. पाश्चात देशांमध्ये कोरोनाची तिसरीला आली आहे. लस न घेणाऱ्यांची संख्या आपल्याकडे अजूनही जास्त आहे. त्यामुळे त्यांना यावेळी भीती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
कोरोनावर रामबाण औषधं सापडलेलं नाही. त्यामुळे अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. सर्वांनी कोरोना प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मंत्रालयात जाऊन त्यांनी काय दिवे लावले? • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2021
Rating:
