सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : समाजातील गरीब ,अनाथ, निराधार वृद्ध दिव्यांग व्यक्तीं यांना उपजिविका करण्याच्या उदेशाने शासनाकडून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यांत येते. परंतु मागिल काही महिन्यांपासून अनुदानचे (मासिक) वितरण करण्यात आले नव्हते. त्या साठी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी तहसिलदार चिमूर यांना एक लेखी निवेदन दिले हाेते.
त्यांचे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना उपजिविकेसाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. तर अनेक लाभार्थी प्रशासकीय कार्यालय व बॅंकेचे उंबरठे झिजवित होते. मात्र, त्यांचे खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे आल्या पाऊलीच त्यांना घरी जावे लागत होते. त्यामुळे दिव्यांग,अनाथ, निराधार योजनेचे अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे. यासाठी चिमूर प्रहारच्या वतीने ही मागणी रेटून धरण्यांत आली.
दरम्यान तहसीलदार यांच्या कॅबीनमध्ये स्वतःला कोंडून आंदोलन करण्याचा इशारा प्रहारने प्रशासनाला या पुर्विच दिला होता. सदरहु निवेदनाची दखल घेत अवघ्या ६ दिवसांत अनुदान वितरित करण्यात आले. या मागणीचे निवेदन सादर करतांना प्रहार सेवक विनाेद उमरे, मुरलीधर रामटेके, नारायण निखाडे, सत्यपाल गजभे, स्वप्नील खोब्रागडे, रमेश वाकडे आदीं उपस्थित होते.
प्रहारच्या प्रयत्नाला आले यश: दिव्यांग,अनाथ, निराधार योजनेचे अनुदान दिवाळी पूर्वीच अदा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2021
Rating:
