बाेगस व बनावट रासायनिक खतांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणांऱ्या कृषी केंद्र संचालकाने नुकसान भरपाई द्यावी!



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या शंकरपूर येथील बहुचर्चित दत्त कृषी केन्द्राचे संचालक राजू उर्फ प्रदिप मनिराम वैद्य यांनी शेतक-यांना शेती हंगामात बाेगस व बनावट रासायनिक खतांची विक्री करुन शुध्द फसवणूक केली असल्याचे प्रकरण काही दिवसांपुर्वी उघडकीस आले असुन, या संदर्भात कृषी केन्द्र संचालकाविरुध्द विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. तदवतचं कृषी विभाग चिमूर तथा चंद्रपूर विभागाच्या अधिका-यांनी रितसर चाैकशी करुन या बाबतीत पाेलिस विभागास काही पुरावे देखिल सादर केल्याचे वृत्त ऐकीवात आहे. दरम्यान, चंद्रपूर येथील प्रहारचे युवा नेता महेश हजारे यांचे नेत्रूत्वाखाली शंकरपूर परिसरातील काही शेतक-यांनी  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची काल साेमवार दि.१ नाेव्हेंबरला भेट घेतली व चर्चा करुन हतबल झालेल्या शेतक-यांना संबंधित कृषी केन्द्र संचालका कडुन नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. या दुकानातुन ब-याच शेतक-यांनी रासायनिक खते खरेदी केले असुन, त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. फसवणूक झालेल्या शेतक-यांची परिस्थिती फार बिकट झाली असुन शेतक-यांचे अंदाजे पाच ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. अशा आशयाचे एक निवेदन चंद्रपूर प्रहारच्या माध्यमातुन कालच सायंकाळी पाेलिस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिका-यांना सादर करुन फसवणूक झालेल्या शेतक-यांना याेग्य न्याय देण्यांची मागणी या निवेदनातुन करण्यात आली.
निवेदन सादर करतांना महेश हजारे, अशिद अमरदिप मेश्राम, कमलाकर दादाजी ठाकरे, किशाेर सर्जेराव चौधरी, पवन सजन गजघाटे, आशिष अशाेक ठाकरेंसह अन्य कास्तकारांचा समावेश हाेता. याच शिष्ट मंडळाने काल चंद्रपूर येथील क्रूषी विभागाच्या एका अधिका-यांची भेट घेवून या प्रकरणा बाबत सविस्तर चर्चा केली असल्याचे महेश हजारे यांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.
 
बाेगस व बनावट रासायनिक खतांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणांऱ्या कृषी केंद्र संचालकाने नुकसान भरपाई द्यावी! बाेगस व बनावट रासायनिक खतांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणांऱ्या कृषी केंद्र संचालकाने नुकसान भरपाई द्यावी! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.